कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या विद्यमाने दास नवमी उत्सव मुलांच्या पठाण स्पर्धेने उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी दासबोध, मनाचे श्लोक तसेच रामरक्षा पाठांतर स्पर्धा विविध गटात आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत आगाशे, प्रमुख पाहुण्या सौ शुभांगी साठे सौ स्नेहल वैशंपायन कार्याध्यक्ष देशकुलकर्णी आदीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ तेजा मुळ्ये यांनी केले.
संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी तसेच संस्कार होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन स्नेहल वैशंपायन यांनी केले
संत रामदास स्वामी यांच्या बद्दलची माहिती सौ साठे यांनी सांगून आजच्या जीवनात रामदास स्वामी यांच्या विचारांचे महत्व कायम राहणार आहे असे प्रतिपादन केले.
परीक्षकांच्या वतीने सौ सुरेखा जोशी यांनी आपल्या मनोगतात रमारक्षेचे महत्व सांगितले .
अध्यक्ष श्री अनंत आगाशे यांनी संस्थेचे नाव ब्राह्मण सभा असले तरीही सर्व समाजातील मुलावर संस्कार करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केले.
या स्पर्धेमध्ये अनुज करकरे, आरव पेडणेकर, गुंजन वासावे, स्वरांज्ञी सरपोतदार, लावण्या पांचाळ, रुद्र आंब्रे यांना त्यांच्या गटात प्रथम तर आर्ची चव्हाण, ऋचा पावरी ,श्रुती शिंदे, सावनी सरपोतदार, आराध्या पेडणेकर यांना त्यांच्या त्यांच्या गटात द्वितीय क्रमांक मिळाले आहेत. विशेष गटामध्ये वसुधा वझे आणि गायत्री घाटे यांना पारितोषिक देण्यात आले. सौ नीलम जोशी यांनी सूत्र संचालन केले तर
सौ शितल कुलकर्णी सौ हर्षदा पंडित श्री अविनाश फाटक श्री धनंजय नावाथ्ये सौ रेखा इनामदार आणि सौ सुरेखा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सौ तेजा मुळ्ये,
सौ श्रद्धा जोशी,सौ निलम जोशी,
सौ श्वेता सरपोतदार,सौ मधुरा पटवर्धन
सौ सुषमा पटवर्धन,सौ निला केळकर
अपूर्वा मुसळे,कोमल पटवर्धन
सौ श्रिया रानडे,श्री ओमप्रकाश गोगटे
श्री रवींद्र रानडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.










