चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना अटक 

 

खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील धामणादिवी गावच्या हद्दीत व परशुराम घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच उभ्या केलेल्या अमित शंकर धाडवे (३०, व्यवसाय – टपरी चालक, रा. परशुराम दुर्गवाडी, ता. चिपळूण , जि. रत्नागिरी ) यांच्या ‘ मैत्री कट्टा ‘ नामक टपरीच्या कुलुपाला दगडाने मारून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघां संशयिताना येथील पोलीसांनी अटक केली आहे. हि घटना ३ मार्च रोजी दुपारी २:१५ वाजताच्या दरम्यान घडली.

 

मनिष महेश गुरव (१९, रा. मोसम – गुरववाडी, ता. राजापूर , जि. रत्नागिरी ) व मनोज सुर्याजी आयरे (२८, रा. गवाणे गावठणवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्या ची नावे असून त्यांच्चावर गुन्हा भा. दं. वि. सं. क. ५११, ४६१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.