तळवली ग्रा पं मध्ये महिलादिन विविध उपक्रमांनी साजरा

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली ग्रा.पं येथे महिला दिन विविध उपक्रमांनी पार पडला.यावेळी महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यावेळी तळवली ग्रामभवन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सरपंच मयुरी शिगवण,वैद्यकीय अधिकारी डॉ.देसाई,बँक मॅनेजर श्री भूतेकर,तलाठी भिसे,ग्रामविकास अधिकारी श्री बागुल,सामाजिक कार्यकर्ते व प्रा.अमोल जडयाळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.देसाई यांनी आरोग्यविषयक,बँक मॅनेजर श्री भूतेकर यांनी बँक योजना,तलाठी भिसे व ग्रामविकास अधिकारी श्री बागुल यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.उपस्थितांचे आभार प्रा. जडयाळ यांनी मानले.