सावंतवाडी । प्रतिनिधी : कोल्हापूर येथील शिवाजी भोसले एज्युअर्ड आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एक मधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नील नितीन बांदेकर याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत तो राज्यात पहिला आला तसेच रंगोत्सव 2022 -23 च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हस्ताक्षर मध्ये गोल्ड मेडल मिळवत त्याने स्केचिंग स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक प्राप्त केले.
त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त झालेल्या विविध वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धेतही तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.आतापर्यंत नीलने मिळविलेल्या बक्षीसांची संख्या ही 130 एवढी झालेली आहे.
यासाठी त्याला केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापक त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले .
नीलवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे