वेंगुर्ले | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन ने राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सन्मान सोहळ्यामध्ये ‘कोकणरत्न शिक्षण क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा म्हणून गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या श्री सरस्वती विद्यालय आरवली प्रशालेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत शिक्षिका पूर्वाश्रमीची श्रीमती श्रद्धा सोनु नाईक व आता सौ. श्रद्धा प्रवीण तांडेल यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथे हा सन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले सिंधुदुर्ग मधून शिक्षिका श्रद्धा नाईक-तांडेल यांना सन्मानित करण्यात आले. शाळेतील विविध उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण विकास. वक्तृत्व, निबंध कथाकथन, गायन स्पर्धासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव. विद्यार्थी शिक्षक, पालक यांच्या समन्वयातून शाळेची प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. वेंगुर्ले तालुक्यातील विविध शाळांमध्ये व्यक्तिमत्व विकास विषयांतर्गत उपक्रमातून विद्यार्थ्यांना वक्तृत्व कौशल्याचे मार्गदर्शन करून कौशल्य विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या तालुका जिल्हास्तरीय निबंध, स्वरचित काव्यगायन स्पर्धेत सुयश प्राप्त. सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्र सीसीआरटी नवी दिल्ली ओरिएंटेशन कोर्स मध्ये सहभाग प्राप्त. शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन. पुरस्कार सर्वप्रथम व्यक्तिमत्व विकासाचा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वक्तृत्व कौशल्य प्राप्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी २०११ साली रोटरी क्लब मुंबई गोरेगाव तर्फे त्यांचा अवार्ड देऊन सन्मान झाला आहे. सिंधुदुर्ग जि. माध्य. अध्यापक संघ आदर्श युवा कार्यकर्ती म्हणून २०१७-१८ साली सन्मान. सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळातर्फे आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार. २०२१ -२२ ला हिंदी प्रचारसभा वेंगुलांतर्फे आदर्श हिंदी अध्यापिका पुरस्कार प्राप्त. दरम्यान त्यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सरचिटणीस ॲड.सौ.मनिषाताई रोटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.












