मालवण | प्रतिनिधी : सुकळवाड ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत किशोर पेडणेकर विजयी झाले आहेत. अपक्ष सदस्या प्रमिला पाताडे यांची या निवडीत पेडणेकर यांना साथ लाभली आणि त्यांचा विजय निश्चित झाला.
सरपंच युवराज गरूड, प्रकाश पावसकर, अजिंक्य पाताडे, स्वप्निल गावडे, चेतन मुसळे, सागर कुशे, बाळा टेंबूलकर, अनिल पालकर, सुभाष म्हसकर, पंढरी पाताडे, प्रमिला पाताडे, जानकी पावसकर, जान्हवी पालकर यांसह अन्य उपस्थित यांनी ग्रामपंचायत येथे उपसरपंच किशोर पेडणेकर यांचे अभिनंदन केले.












