हाताला काम श्रमाला दाम हे ब्रीद : अभ्यासाबरोबर व्यावसायिक शिक्षण
वेंगुर्ले l दाजी नाईक : हाताला काम श्रमाला दाम हे ब्रीद घेऊन शैक्षिणक वर्ष २०२४ मध्ये कोझ टू कनेक्ट फाउंडेशन आणि दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने तंत्र शिक्षण विभाग सुरू आहे. दाभोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना नवीन येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्वानुसार व्यवसाय शिक्षणाचे महत्व, गरज व ओळख होण्यासाठी तंत्रशिक्षण विभाग सुरू आहे.अगदी अल्पावधीत विद्यार्थी पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सदर उपक्रम सुरू आहे.
गणेश चतुर्थीचे निमित्ताने शाळेतील तंत्रशिक्षण विभागातील विविध विभागाच्या वतीने वेंगुर्ला येथील वर्दळीच्या दाभोली नाका तसेच दाभोली येथील दाभोली तिठा येथे दोन दिवस विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे
प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू त्याची प्रत्यक्ष मांडणी, जमा खर्च नियोजन, विक्री आदी बाबत शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी झालेल्या विक्री मधून शाळेस चांगला फायदा झाला. सदर फायदा सर्व विद्यार्थ्यांना समान वाटण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः ची गुंतवणूक म्हणून जमा केलेली रक्कम म्हणजे भांडवल त्यांना रोख न देता तसेच झालेल्या फायदा हा रोख न देता त्यांना तो एकत्रित देण्याचे नियोजन करण्यात आले.
शाळेत विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून खानोलकर परिवार यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या स्टील चे पीगी बँक चे वाटप करण्यात आले.
बचत सवय लागावी म्हणून सुरवातीस सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी गुंतवलेले भांडवल तसेच झालेला फायदा सर्व विद्यार्थ्यांना नाणी स्वरूपात देऊन एकत्रित पिगी बँक मध्ये एकत्रित एक एक नाणे सर्वांनी टाकून सर्वांनी एकत्रित आमची शाळा बचत शाळा संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांना दोन महिने मुदत देऊन प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पी गी बँक मध्ये रू १००० जमा करण्याचे ठरवले. त्या प्रमाणे विद्यार्थीनी सदर रक्कम जमा केली.
जमा रक्कम बाबत सर्व विद्यार्थी एकत्रित सारस्वत बँकेत खाते काढण्याचे ठरले, सारस्वत बँक व्यवस्थापक श्री सतीश वाळवे, श्री सामंत सर यांनी शालेय विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व तसेच बँक चे विविध योजना या बाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांनी स्वमेहनितून जमा केलेल्या बचती बाबत कौतुक करून अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर सोनसुरकर सर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत शाळेचे आभार मानण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून बचतीची सवय लागावी म्हणून हा एक आदर्श उपक्रम असेलच असे सांगितले.
मुख्याध्यापक श्री सोनसुरकर सर यांनी सदर उपक्रमबाबत सांगताना या उपक्रमातून जी बँक खाती काढण्यात आली आहेत त्या मध्ये विद्यार्थी फक्त बचत करतील व या खात्यातून कोणतीही रक्कम न काढता सदर रक्कम फक्त पुढील शिक्षणासाठी वापरतील व अचानक पालकांसमोर उभा राहणारा आर्थिक प्रश्न हा काही प्रमाणत कमी होऊन पालकांना एक आधार मिळेल असे सांगितले. या उपक्रमात पालकांनी घेतलेला सहभाग अत्यंत समाधानकारक आहे, असे सांगितले यासाठी सहकारी शिक्षक, कर्मचारी यांनी भरपूर मेहनत घेतली असे ही त्यांनी सांगितले.
आमची शाळा बचत शाळा उपक्रमाअंतर गत सर्व विद्यार्थ्यांना सारस्वत बँक चीं पासबुक वाटप करण्यात आली व विद्यार्थ्यांनी आमची शाळा बचत शाळा म्हणून घोषणा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री सुधीर गोलतकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री आत्माराम प्रभुखानोलकर, शिक्षक श्री वसंत पवार सर, श्री दिपक पाटील सर, श्री नितीन घोगाले आदी उपस्थित होते. शेवटी आभार सौ रेशमा चोडणकर मॅडम यांनी मानले.











