प्रख्यात लेखिका डॉ.पूजा सामंत यांना यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार

जागतिक महिला दिनानिमित्त कै. उदय खानोलकर वाचन मंदिरतर्फे होणार सन्मान 

सावंतवाडी । प्रतिनिधी :साहित्य, कला, समाजभान, निवेणी संगम कर्तृत्वाचा सोहळा सन्मानाचा हे ब्रिद घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा शनिवार ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृह येथे आयोजीत करण्यात आला आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उज्ज्वला खानविलकर पुरस्कृत कै. यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार मळगावच्या स्नुषा प्रख्यात लेखिका डॉ. सौ. पूजा पराग सामंत, पुणे यांना श्रीमती वंदना करंबेळकर, संचालिका निरामय केंद्र, कोलगाव व सामाजिक कार्यकर्त्या, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे ग्रंथालयाचे अध्यक्ष भूषविणार आहेत. तरी या सत्कार समारंभास सर्व वाचक सभासद, ग्रामस्थ, हितचिंतक, आश्रयदाते, देणगीदार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव,संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.