दापोली | प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील आवाशी गावातील मुंबई स्थित ग्रामस्थ अजय शेडगे यांच्या पुढाकारानेआवाशी येथील शिमगोत्सवामध्ये कचरा मुक्त गाव संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला.
शिमगोत्सवानिमित्त दापोली तालुक्यातील आवाशी गाव येथील हनुमान मंदिरात प्लास्टीक आणि ओल्या कच-याचे नियोजन कसे करायचे या करिता पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्लास्टीकच्या विळख्यातले पाणी या विषयाअंतर्गत पाॅवर पाॅईंट च्या माध्यमातून त्यांनी सादरीकरण केले.गाव कचरा मुक्त आणि जलयुक्त कसे करायचे या बाबत आणि विषमुक्त शेती करून एक आदर्श गावाची निर्मिती कशी निर्माण करता येईल याबाबत सविस्तर विवेचन केले.शिमगोत्सवानिमित्ताने सामाजिक प्रबोधन करणारे आवाशी हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले असून सर्वांनी या गावाचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे मत परांजपे यानी व्यक्त केले.
या प्रसंगी रत्नग्रीन टेक्नोसर्व्हिसेसचे मनिष आपटे यांनी घरच्या घरी खत निर्मितीच्या पोर्टेबल युनिटची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.