ज्ञानदीप विद्यालय हिवाळे हायस्कुलच्या वर्गखोलीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून 10 लाख निधी

 

भाजप नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा :

अमित खोत | मालवण : ज्ञानदीप विद्यालय हिवाळे हायस्कुलच्या वर्गखोलीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून खासदार निधीतून 10 लाख निधी मंजूर झाला आहे. याबाबत माहिती माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिली.

गेली कित्येक वर्षे विद्यालयाची इमारत मोडकळीस आलेली होती. ही बाब संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे, सचिव चंद्रकांत चव्हाण, संचालक व ग्रामस्थ यांनी सभा घेवून माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, सरपंच रघुनाथ धुरी यांच्या मार्फेत भाजप नेते निलेश राणे यांच्याकडे केली. निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून वर्गखोलीसाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहेत. त्याबद्दल संस्थेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानत समाधान व्यक्त करण्यात आले.