विरण पोईप येथील नादुरुस्त पुलाची तात्काळ दुरुस्ती पुर्ण : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ : आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
अमित खोत | मालवण : जनतेच्या जे हिताचे आणि गरजेचे आहे ते त्वरित झालेच पाहिजे. ग्रामस्थ, विद्यार्थी यांची कोणतीही गैरसोय होता नये. या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करत विरण पोईप मुख्य मार्गांवरील नादुरुस्त पुलाची दुरुस्ती आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण झाली आहे. पुन्हा एकदा या मार्गांवरून सर्व प्रकारची वाहतूक सुरु होत असून पुर्ण झालेल्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
जनतेच्या व वाहतूकीच्या दृष्टीने या पुलाची असलेली आवश्यकता लक्षात घेता आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी पाहाणी करून तात्काळ काम सुरु करण्याच्या सूचना 9 जुन रोजी दिल्या होत्या. तत्परता काय असते, जनतेसाठी तन मन आणि धन अर्पण करून काम कसे करावे याचा प्रत्यय आमदार निलेश राणे यांच्या याही कामातून दिसून आला. वीस दिवसात पुलाची दुरुस्ती योग्य पद्धतीने पुर्ण करण्यात आली. जनतेच्या जे मनात तेच आमदार निलेश राणे यांच्या कार्यातून स्पष्ट होते असे दत्ता सामंत यांनी या निमित्ताने सांगितले.
मालवण बेळणे मुख्य मार्गांवरील विरण पोईप येथील छोट्या पुलाची संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला. अवजड वाहतूकिस रस्ता बंद करण्यात आला. पाऊस व पाण्याच्या प्रवाहात रस्ता अधिक खचून मार्ग बंद होण्याची स्थिती निर्माण झाली. याबाबत माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी तात्काळ विरण येथे जाऊन पाहाणी केली होती. पुलाच्या संरक्षक भिंत आणि खचलेल्या भागाचे काम तात्काळ सुरु करा. अश्या सूचना बांधकाम अधिकारी यांना करत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली, कामही पुर्ण झाले. त्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, सरपंच श्रीधर नाईक, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहर प्रमुख दीपक पाटकर, पंकज वर्दम, किरण प्रभू, प्रशांत परब, दत्ताराम आंबेरकर, तालूका प्रवक्ते निलेश बाईत, मनोज हडकर, मंदार लुडबे, शानू वालावलकर यांसह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुलाचे काम तातडीने पुर्ण केल्या बद्दल आमदार निलेश राणे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.












