मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत देवधे मणचे शाळा लांजा तालुक्यात तृतीय

 

लांजा (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये शासकीय शाळा स्पर्धा गटात जिल्हा परिषद शाळा देवधे मणचे शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

शाळेचे अंतरंग व बाह्य परिसर तसेच विविध विभागांमध्ये परिपूर्ण गुण मिळवून शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत देवधे मणचे शाळेने खो-खो व कबड्डी स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळेच देवधे मणचे शाळेने हे यश मिळवले असल्याने जिल्हा परिषद रत्नागिरी चे शिक्षण व अर्थ समिती सभापती माननीय चंद्रकांत मणचेकर यांनी शाळेची भेट घेऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले.

या सर्व यशाच्या पाठीमागे शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव , नंदकुमार पाटोळे , नानासाहेब गोरड व सायली तिखे यांच्याबरोबरच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.