संतोष वायंगणकर
एखाद्या व्यक्तिच कार्य, कर्तृत्व आणि समाजाप्रती असणारी आस्था कोणाच्याही मनात घर करून जाते. आजचे केंद्रियमंत्री ना. नारायण राणे हे व्यक्तिमत्वही असच आहे. १९८७ साली नारायण राणे यांना कणकवलीत प्रथम पाहिलं, भेटलो. मी तेव्हा बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, बेस्टचे चेअरमन होते. नारायण राणे तेव्हा गावी आलेले. शिवसेनेच्या कणकवलीतील शाखेत त्यांच येणं व्हायचं. त्यांच्यातील बेधडकपणा, नजरेतील जरब , त्यांचं ब्लॅक पँण्ट, हाफ शर्ट आणि दोन्ही खिशात हात घालून रूबाबात उभं राहण्याची स्टाईल खास होती.
कॉलेजला असल्यापासून शिवसेना मनात होतीच. नारायण राणे यांना पाहिल्यापासून त्याबद्दल अधिकच वाटू लागल. १९९० मध्ये नारायण राणे मालवण-कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडून आले. आणि मग त्यांच कोकणशी नातं अधिक घट्ट झालं. लोकसंपर्क त्यांनी असा काही वाढवला की अवघं कोकणच त्यांच्या प्रेमात पडलं. त्याचे कारणही तसच होतं. कोणतही काम तत्काळ झालं पाहिजे. त्यासाठी त्यांची अशी एक कामाची स्टाईल होती. कार्यकर्त्याला त्यांनीच जपाव. कोणत्याही कार्यकर्त्याच्या त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात येणारा प्रसंग, निर्माण होणारा प्रश्न त्यांनी आपला मानला. कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची पद्धत फार वेगळी आहे. यामुळेच कार्यकर्त्यांचे मोठं जाळ आपोआप तयार होत गेलं. समाजातील एक घटक नेहमीच त्यांच्याविषयी अफवा पसरवत राहिला तर ज्यांनी त्यांची भेट घेतली आहे जे त्यांच्याशी बोलले आहेत त्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वासही बसला आणि यामुळे ‘दादांना’ मानणारा एक मोठा वर्ग कोकणात आहे.महाराष्ट्रात आहे.
समाजात अफवा पसरवून राजकारण करणारा घटक खरंतर नारायण राणे यांच्या समोर हतबल आहे. राणेंच्या कार्याशी, त्यांच्या विकासकामांशी स्पर्धा करता येत नाही. स्पर्धा करू शकत नाही त्यामुळेच मग असत्यावर आधारित कोणताही दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या घटनेशी राणेंच नांव जोडण्याची एक स्पर्धाच सुरू झाली. राजकारणातील काही ‘पुड्या’ सोडणाऱ्यांनी इतक्या पुड्या सोडल्या की राणेंचा काडीचाही संबंध नसणाऱ्या गोष्टींचाही गॉसिप तयार करण्यात आला. त्यात फक्त राजकारण होतं. राजकीय इश्यू करून त्याचा राजकीय मतांसाठी फायदा उचलण्याचा प्रकार होता. दहशतवादावर तर १९९० पासून काल-परवा पर्यंत राणे विरोधी पुढाऱ्यांनी त्याची पारायणं केली. एका निवडणुकीत उत्तरप्रदेश, बिहारचे पोलिस निवडणुककाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणले गेले. अशाच एका बिहारच्या पोलिस अधिकाऱ्याची मालवण तालुक्यात निवडणुककाळात फिरताना भेट झाली.
मी सहजच दहशतवादाचा विषय त्या अधिकाऱ्याकडे काढला. तर ते प्रमुख पोलिस अधिकारी मला म्हणाले, कहाँ है आतंकवाद यहाँ तो लोग बहुत अच्छी तरह से अपने काम में लगे रहे है. हमे यहाँ क्यों लाया गया इसका भी पत्ता नही है… याचा अर्थ नाहक चुकीची इमेज काही राजकीय नेते, पुढाऱ्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा परिणाम जनमाणसांवर होऊ शकला नाही. १९९० साली आमदार झालेल्या नारायण राणे यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ते केंद्रियमंत्रीपद असा खरंतर थक्क करणारा प्रवास त्यांनी केला आहे. शिवसेनेत ३९ वर्षे रमलेल्या ना.नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली हे खरंतर नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटनितीने अनेकांनी शिवसेना सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. १९९० पासून आजपर्यंत तब्बल ३४ वर्षे ना.नारायण राणे यांना पहात, ऐकत आलोय. २००८ पासून राणे प्रकाशन प्रा.लि. दैनिक प्रहारमध्ये काम करताना तर दादांना अधिक जवळून अनुभवता आले आहे.
केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांच्यामध्ये असलेला माणूसपण जपणारा एक प्रेमळ माणूस पहाता आला. दैनिक रत्नागिरी टाईम्समध्ये काम करताना मालवणी मुलखात या स्तंभ लेखनातील ‘‘कुणी घर देईल का ? घर !’’ या हेडिंगचा लेख वाचून त्या क्षणी वैभववाडी तालुक्यातील एका धनगर कुटुंबातील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ झालेल्या चार भावंडाना ‘सावली’ नावाच निवासस्थानात त्यांना आधार देणारे नारायण राणेच होते. अशा अनेक प्रसंगातून दादांमधला माणूस किती सह्दयी आहे हे पहाता, अनुभवता आले. राजकारणातही नारायण राणे यांनी घेतलेले निर्णय फक्त तेच घेऊ शकतात आणि त्याच धाडसाने, जिद्दीने पुढे जाऊ शकतात.हे सर्वानीच पाहिले आहे.
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रासाठी कोकणा साठी विकासकाम करता आल तेव्हा त्यांनी ते केल आहे.केन्द्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खा. विनायक राऊत यांनी सूक्ष्म शब्दाचा उल्लेख करत भाषण करताना दोन बोटांची चिमटी करुन दाखवायचे पंरतु जेव्हा अर्थसंकल्पात या सूक्ष्म, लघु, मध्यम विभागासाठीची चाळीसलाख कोटीची तरतूद पाहिल्यावर सर्वांचे डोळे विस्फारले.नारायण राणे ज्या पदावर विराजमान झाले त्या पदाची उंची त्यांनी कार्य कर्तृत्वाने वाढवली मग ते पद कोणतेही असो हे राणे विरोधक बोलून दाखवतात.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या दादांनी कधी राजकीय नुकसानीची आणि परिणामाची कधीच पर्वा केली नाही. नेहमी संघर्ष करत अधिक तेजाळत गेलेलं हे व्यक्तिमत्व आहे. नारायण राणे हे मुळात कुणाचा द्वेष करत नाहीत. स्वभावगुणात स्पष्टवक्तेपणा आहे. मनात एखाद्या विषयी राग न धरता जे काही आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. आपल्या बोलण्यातून राजकीय फायदा होणार की तोटा हा राजकीय हिशोबीपणा त्यांच्यापाशी नाही. त्यांच्याकडे सिक्युरिटीच्या ड्युटीवर असणारे पोलिस जेवले आहेत की नाहीत, त्यांना नाष्टा मिळाला …इतक्या लहान-सहान गोष्टीतही स्वत: लक्ष घालणारा दादांमध्ये एक दिलदार माणूस आहे.
इतिहास आणि नवीन संशोधन सांगणार कोणतही पुस्तक आलेलं असेल तर दादांनी ते वाचलेल असणार. नारायण राणे विधानसभा विरोधी पक्षनेता होते मी मुंबईत गेलेलो आकाशवाणी आमदार निवासाबाहेर बुक स्टॉल वर कवी ना. धो. महानोर यांच शरद पवार आणि मी हे पुस्तकत् घेतल आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या निवासस्थानी गेलो माझ्या हातातील पुस्तक पाहिल्यावर,दादा म्हणाले,, अरे महानोरांनी खूप छान लिहीलय खरतर त्या पुस्तकाच प्रकाशन तेव्हा 15 दिवसापूर्वीच झाल होत ते पुस्तक दादांनी वाचलेल होत.यांच्यात एक उत्तम वाचक, अर्थशास्त्र समजून घेऊन अभ्यासणारा नेता ते आकडेवारी सांगू लागले की समजून जातो. शेती क्षेत्रावरही हक्काने माहिती देणारे राणे साहेब अनेकवेळा अनुभवता आले आहेत. अशा या महाराष्ट्रातच नव्हेतर देशाच्या राजकारणात स्वत:च्या कार्याने, कर्तृत्वाने ठसा निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या वादळासोबत काम करताना खुप काही शिकता आले, समजून घेता आले.











