पियाळी ग्रामसेविका संगीता पाटील यांना मिळाला भारतीय नारी रत्न सन्मान पुरस्कार 

ग्लोबल फाउंडेशन पुण्याच्या वतीने रजत पदक देवून केला सन्मान

कणकवली :ग्लोबल फाउंडेशन पुणे च्या वतीने कणकवली तालुक्यातील पियाळी ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या, श्रीमती संगीता पाटील यांना भारतीय नारी रत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वतःच्या अपंगत्वावर मात करून यशस्वीपणे ग्रामपंचायतीची सचिव म्हणून धुरा सांभाळणाऱ्या संगीता पाटील या कोरोना काळातही “कोरोना योद्धा” म्हणून यशस्वी काम केले. या सर्वांची दखल ग्लोबल फाउंडेशन ने घेतली आहे. पदमश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या हस्ते रजत पदक देवून सन्मानित करण्यात आले.

ग्लोबल फाऊंडेटशन पुणे सन्मान सोहळा नुकताच यशदा ऑडिटोरीयम पुणे येथे संपन्न झाला. भारतातून सदर सन्मानासाठी निवडक रत्नाचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्रीमती संगीता पाटील याचा भारतीय नारी रत्न म्हणून सन्मान चिन्ह व सिल्वर पदक देऊन सन्मान केला.