माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील आमनायेश्वर मंदिरात जत्रोत्सव होणार आहे.दरवर्षी या महाशिवरात्री दिनी जत्रा भरते.यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात.
रात्री आमनायेश्वर मंदिरा भोंवती पालखी सोहळा होणार आहे.दुसऱ्या दिवशी लळीताचे कीर्तन होईल तर १० तारखेला सकाळी ११.३०ते ३.३० या वेळेत महाप्रसाद होणार आहे.तर रात्री १० वाजता श्री आमनायेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ बुरंबाड पुरस्कृत श्री दत्त साई मंडळाचे दोन अंकी चौथरा हे नाटक होणार आहे.
या वर्षीच्या उत्सवाचा सगळा खर्च श्री व सौ सुषमा प्रभाकर मोरे हे करणार आहेत तर महाप्रसादाचा खर्च कै.मारुती रत्नू गांगरकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती सरिता मारुती गांगरकर व परिवार करणार आहेत.
जत्रोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाना व महाप्रसादाला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष संजय सहस्त्रबुद्धे, खजिनदार शशिकांत घाणेकर यांनी केले आहे.












