वैभववाडीच्या माजी सभापती शुभांगी पवार यांचे निधन

Google search engine
Google search engine

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी मारुती पवार वय 60 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे. श्रीमती पवार यांची कट्टर राणे समर्थक अशी ओळख होती. पक्ष संघटना वाढीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. खांबाळे गावच्या माजी सरपंच म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. कंत्राटी वायरमन दिनेश पवार यांच्या त्या मातोश्री होत.
काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. खांबाळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे