खेडमधील सहकारी सोसायट्यांना फेर लेखपरिक्षणाबाबत कारवाई चे निर्देश

 

 

खेड(प्रतिनिधी)खेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांना उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले

तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नागरी सहकारी पतसंस्था, तसेच परवानाधारक सावकार यांचे त्रयस्थ शासकीय लेखा परीक्षण तसेच लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक भिकाजी मोहिते- यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयात दिलेल्या अर्जानुसार सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे येथील सहनिबंधक राजेश जाधवर यांनी दिले आहेत.

 

 

खेडमधील सामाजिक कार्यकर्ते दीपक भिकाजी मोहिते यांनी खेड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व नागरी सहकारी पतसंस्था, तसेच परवानाधारक सावकार यांच्यामार्फत कर्ज वाटपात बेकायदेशीर कर्ज वाटप कर्जाची बेकायदेशीर वसुली व अव्याजवी व्याज आकारणी होत असून याबाबत त्रयस्त शासकीय लेखा परीक्षक नियुक्त करणे व विविध कार्यकारी सोसायटी यांचे फेर शासकीय लेखापरीक्षण त्रस्त शासकीय लेखा परीक्षकद्वारे करण्यात यावे, अशी मागणी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे केली होती, त्यानुसार दिलेल्या अर्जामध्ये या संस्था व नियमन व नियंत्रणाच्या दृष्टीने सहकारी संस्था रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक यांच्या अधिकार व कक्षेत येत असल्याने त्याच्यावर उचित कार्यवाही करून त्याबाबत अर्जदार यांना कळवावे असे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे तसेच दीपक मोहिते यांनी १२ जानेवारी २०२४ रोजी या संदर्भात या कार्यालयात अर्ज दाखल केला होता.