रस्त्यांची 29 कामे तर मुख्यमंत्री सडकच्या 52 कामांचा ऑनलाइन भूमिपूजन सोहळा संपन्न.
सिंधुनगरी l प्रतिनिधी :राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोणतेही पॅकेज जाहीर न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 3341 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत व फार मोठा विकास निधी या जिल्ह्यात खर्च होत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी एकूण 4591 कोटी खर्च करून विकास कामे मार्गी लागत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही विकास कामे होताना सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आत्यानंद होत आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाइन भूमिपूजन सोहळ्यात काढले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या 29 कामांचा व मुख्यमंत्री सडक योजनेतील 52 रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. यावेळी सिंधू नगरी येथील नियोजन सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्स वर या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कळ दाबून हे भूमिपूजन केली. भाजप नेते निलेश राणे हे सोनवडे येथील ग्रामीण भागातून जोडले गेले होते. या उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, छाया नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कणकवली विधानसभा मतदारसंघात 209 कामे व 850 कोटी कुडाळ मतदार संघात 119 कामे व 657 कोटी सावंतवाडी मध्ये 255 कामे व 668 कोटी रुपये खर्च होत आहेत. त्याशिवाय अकराशे कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामावर खर्च होत आहे. सर्वसामान्य नागरिकाचे हित जोपासण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा भारत व आपले राज्य प्रयत्न करीत आहे. डबल इंजिनचे सरकार गतिमान असून विकास कामांसाठी विशेष लक्ष या सरकारने दिले आहे. मागील काळात सिंदूर जिल्ह्यात विकासाचा बॅकलॉग राहिला तो आपल्या सरकारने भरून काढला असून जिल्ह्यातील खेडोपाड्यात रस्त्यांचे जाळे आणखी बळकट करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आता खर्च होत आहे. हा पर्यटन जिल्हा असून विशेष लक्ष देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडवे उत्पन्न वाढावे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न केले त्याचाही उल्लेख त्याने केला. गोव्याच्या धर्तीवर काजूला अनुदान द्यावे हा प्रयत्न आता राज्यस्तरावर सुरू झाला असून महाराष्ट्रातील पर्यायाने कोकणातील व प्राधान्य क्रमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूला व काजू उत्पादकांना बळकटी देण्यासाठी शासनाचे धोरण लवकरच जाहीर होईल असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
शासकिय विश्रामगृह फोंडा इमारतीची विशेष दुरुस्ती करणे, वेंगुर्ला तालक्यातील शासकिय विश्रामगृह इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल तिर्लोट नवानगर रस्ता मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे,
सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी बेळगाव रस्ता सुधारणा करने, बांदा शेर्ला डोणकळ रस्ता लहान पुलाचे बांधकाम, शिरोडा तिठा ते रेडी तेरेखोल (गोवा हदद) रस्ता मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे, कुडाळ रेल्वेस्टेशन रस्ता सुधारणा व लहान पुलाचे बांधकाम करणे, कुडाळ तालुक्यातील कनेडी कुपवडे कडावल नारुर वाडोस शिवापुर शिरशिंगे रस्ता पुलाचे (दुकानवाड पुल) बांधकाम करणे, दोडामार्ग तालुक्यातील सासोली कुडासे साटेली रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे, दोडामार्ग तालुक्यातील भेडशी बोडदे खोक्रल मांगेली ते कर्नाटक हद्दीकडे जाणारा रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे, दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापुर नागनवाडी चंदगढ रामघाट दोडामार्ग अस्नोंडा रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे, भेडशी पिकुळे रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे, आचरा (बंदर) वरवडे हरकुळ फोंडा उंबर्डे रस्ता पुलाची पुर्नबांधणी करणे, कणकवली तालुक्यातील बीडवाडी पिसेकामते रस्ता कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणे, वैभववाडी तालुक्यातील जांभवडे बौद्धवाडी रस्ता ग्रा. मा १७ वर नवीन पुलाचे बांधकाम करणे, दाभोळे नारिंग्रे पोयरे रस्ता पुलाची पुर्नबांधणी करणे, ओरोस सावंतवाडा येथे ग्रा. मा. ८२ येथे कॉजवेच्या जागी उंच पातळीचा पूल बांधणे, रानबांबुळी आरोस वर्दे कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणे रानबांबुळी आरोस वर्दे कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणे या कामाचा ऑनलाईन भूमिपुजन कार्यक्रम.रेडी येथील देवी माऊली मंदिर परिसरात बहुदेशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे, रेडी येथील देवी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभिकरण करणे, आंबोली विश्रामगृहाचे बांधकाम, बांदा येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचे विस्तारीकरण, कुडाळ विश्राम गोवा दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उप विभाग कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे सावंतवाडी तालुक्यातील कनेडी कुपवडे शिवापुर शिरशिंगे सांगेली दाणोली बांदा सुधारणा करणे, सावंतवाडी तालुक्यातील नेमळे बादे तळवडे रस्ता व पुलाचे बांधकाम, आचरा कणकवली रस्ता रूंदीकरण व काँक्रीटीकरण या कामांचा ऑनलाइन शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला.
सिंधुनगरीसाठी 32 कोटी
सिंधुनगरी या मुख्यालय शहराच्या विकासासाठी तब्बल 32 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे व या शहराला विकासात्मक गती दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले. सिंधू नगरीतील 15 किलोमीटर लांबीचे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या शहरातील सर्व रस्ते डागडुजी होऊन सुस्थितीत होतील असा निर्वाळाही त्यांनी दिला. सिंधुनगरी सुशोभीकरण अत्यावश्यक सुविधा, शिवछत्रपतींचा पुतळा, प्रवेशद्वार व शहर अंतर्गत विकास कामे यावर हा निधी खर्च होणार आहे
त्यामुळे शेअरवासीयांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंगणेवाडी साठी आठ कोटी रुपयांचा निधीही आपण उपलब्ध करून दिला यात्रा स्थळाला विशेष दर्जा दिल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
9000 बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब कष्टकरू अशा सुमारे 9000 बांधकाम कामगारांना कामगार विभागाच्या वतीने गृहपयोगी साहित्याचे वाटप होत आहे. या सर्व कामगारांना गावच्या सरपंचां समक्ष या साहित्याचे वाटप व्हावे. गृहपयोगी साहित्य असल्यामुळे लाभ प्राप्त कामगारांना ते पारदर्शकपणे द्यावे असे आवाहनही पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार अधिकारी संदेश आयरे हेही उपस्थित होते.











