वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा

Google search engine
Google search engine

भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांना डि.के. सुतार यांचे निवेदन

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्यात, त्याचबरोबर वैभववाडी तालुक्यातील विविध समस्या व प्रश्न मार्गी लावण्यात यावेत या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांना दिले आहे. समस्या मार्गी न लागल्यास 29 मार्च रोजी वैभववाडी ग्रामस्थांसह पुन्हा उपोषण करण्याचा इशारा श्री.सुतार यांनी निवेदनातून दिला आहे.

विविध समस्या व प्रश्नांसाठी डि. के. सुतार यांनी 1 नोव्हेंबर रोजी उपोषण केले होते. दरम्यान संबंधित अधिकारी यांनी एक महिन्यात प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते. परंतु सदरची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत.
शहरात जुन्या स्टॅन्ड समोर गटार व्यवस्था नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना व ग्रामस्थांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. वैभववाडी – फोंडा, व वैभववाडी – तरेळे मार्गावर शहरांत दुतर्फा गटारे बांधण्यात यावीत. बस स्थानकात संडास व बाथरूमची सोय करण्यात यावी. मंजूर असलेले डांबरी करणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. कंट्रोल केबिन पर्यायी जागेत हलविण्यात यावी. वैभववाडी ते सडूरे, शिराळे, अरूळे मार्गावरील झाडे तोडण्यात यावी. तसेच रस्त्यातील खड्डे भरण्यात यावे. वैभववाडी बस स्थानकात दोन वाहतूक नियंत्रक ची नेमणूक करण्यात यावी. वैभववाडी बस स्थानकात खडीकरण व डांबरीकरण करणासाठी सुमारे अकरा लाख मंजूर आहेत. सदर काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. या मागण्यांचा त्यात समावेश आहे. सदर कामे 26 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. असे निवेदनात सुतार यांनी म्हटले आहे. न केल्यास उपोषणाचा इशारा डि.के. सुतार यांनी दिला आहे.