जेसीआय खेडच्या वतीने महिला दिनानिमित्त अबोली सप्ताह

खेड (प्रतिनिधी) येथील जेसीआय खेडच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून . ४ ते १० मार्च  या कालावधीत महिलांसाठी अबोली सप्ताह साजरा करत आहे. यानिमित्ताने रोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये  ६ रोजी गरजू विद्यार्थिनींसाठी एल. पी. इंग्लिश स्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक भगत यांनी संस्थेचे आभार मानले. शहरातील स्टालियन जिम येथे रूपाली भोजने व मुग्धा पाटणे यांनी महिलांना योगाप्रात्यक्षिक दाखवले.. ५ रोजी रिद्धी दळवी व सिद्धी दळवी यांनी हेअर आणि स्किन बद्दल काळजी कशाप्रकारे घ्यावी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी जेसीआय अध्यक्ष संकेत आपिष्टे, अमर दळवी, माजी अध्यक्ष दीपक नलावडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे, खजिनदार स्वप्निल कदम, मंदार उसरे यांच्याकडून विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपील कोळेकर यांनी केले.