लोकसभा निवडणुकीवर चर्चा
बांदा l प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षानी आता कंबर कसली आहे. सोशल मिडीया फ्रंट कोकण विभागीय अध्यक्ष सचीन पाटकर आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय भाईप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची माधवबाग (पुणे) येथे भेट घेतली. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बाबत पक्षाध्यक्षांना माहिती देण्यात आली.
पक्षाचे तुतारी हे चिन्ह तळागाळापर्यत पोचविण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. तसेच सोशल मिडीया फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेवुन पक्ष चिन्ह तसेच लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावे॓ळी युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, बांदा शहर अध्यक्षा सुनिता भाईप उपस्थित होत्या.











