ओवळीये रामेश्वर मंदिर नक्षत्र, नवग्रह उद्यान व केळीचीवाडी रस्ता विकासकामांचे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन शुभारंभ 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावरून निधी मंजूर 

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील ओवळीये रामेश्वर मंदिर परिसरात राज्य शासनाच्या यात्रा स्थळ सुशोभीकरण निधीतून नक्षत्र व नवग्रह उद्यान साकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हे पहिले उद्यान आहे. याठिकाणी नवग्रहाची झाडे लावण्यात येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून हे मंजूर करण्यात आले आहे. उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या ओवळीये केळीचीवाडी रस्ता डांबरीकरणाचाही शुभारंभही करण्यात आला. या कामासाठी देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पाठपुरावा केला. माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी याबाबत माहिती दिली.

 

यावेळी माजी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, आनंद शिरवलकर, मकरंद राणे, भाजपा विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, सरपंच रघुनाथ धुरी, ओवाळीये गावप्रमुख दादा परब, बबन परब, बाळा सावंत, रवींद्र गावकर, अच्युत गावकर, अवी गावकर, गणेश गावकर, सदानंद निर्गुण, धनंजय निर्गुण, संदीप सावंत, गणेश हिर्लेकर, महेश तावडे, संतोष कदम, सुभाष सावंत, समीर सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.