मळगांव लातयेवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना कामाचा शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी :
मळगांव लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना कामाचा शुभारंभ सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या नळयोजनेसाठी एकूण १ कोटी रुपये प्रस्तावित असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता बुगडे, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भा.ज..पा शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, निरवडे गावचे माजी सदस्य नागेश उर्फ दादा गावडे, मळगाव ग्राम स्वच्छता कमिटी अध्यक्ष गुरुनाथ गावकर, तात्या लातये, श्रीधर गावकर, तात्या राऊळ, सुभाष लातये, बाळा गावकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.