वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी……

भाजी विकणार्‍या आजींना मोठी छत्रीरूपी सावली देऊन दिला मदतीचा हात.

(स्वप्नील कदम)
समाजामध्ये अनेक महिलांनी आपल्या कतृत्वाचा ठसा समाज मनावर उमटविला आहे. समाजाला आपल्या कार्य कतृत्वाने दिशा देण्याचं काम देखील महिल्यांच्या माध्यमातून होत असतं .यांचा यथोचित सन्मान देखील होत असतो समाजात अशाही महिला असतात ज्या आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अपार मेहनत घेत असतात. त्यांना ना वयाच बंधन ना कोणत्याही बाजारतेठ व्यापार करण्याची भिती. अशाच एक आजी आहेत मालवण तालुक्यातील तिरवडे गावातील मालिनी बापू शिंदे या आजींच वय आहे वय तब्बल 70 वर्षे. आजही त्या आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला विकण्यासाठी कट्टा ,कसाल, ओरोस इ. बाजारपेठांमध्ये एस. टी. ने प्रवास करून आपला भाजीपाल विकतात. आणि कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी सहकार्य करतात.आजही त्यांच्या चेहर्‍यावर तोच उत्साह आणि आनंदही.अशा आजींचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशाळेतील शिक्षिकांच्या माध्यमातून यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी आजींना ,बाजारपेठेतील भाजीपाला विकतांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून एक मोठी छत्री भेट म्हणून देण्यात आली.प्रशाळेतील पर्यवेक्षिका सौ.देवयानी गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी श्रीमती ज्योती मालवदे, सौ. सिमरन चांदरकर, सौ. वीणा शिरोडकर, सौ छाया कानुरकर,श्रीमती निलम भुजबळ, सौ श्रेया सुकाळी, सौ. समिक्षा दळवी . कु.अमिषा परब यांनी सहकार्य केले.या स्तुत्य व निविन्यपूर्ण उपक्रमाचे वराडकर हाय. व कनिष्ठ महा. महाविद्यालय कट्टा, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, माजी विद्यार्थी संघ वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. महिला शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून त्यांच्या अभिनंदन केले जात आहे.