भारताच्या The Elephant Whisperers ने पटकावला ऑस्कर

नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साॅंग कॅटेगरीमध्ये ऑस्कर

ऑस्कर (२०२३) :
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने बेस्ट ओरिजनल साॅंग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला. नाटू नाटू गाण्याने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारदेखील पटकावला होता. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
भारताच्या The Elephant Whisperers ने पटकावला ऑस्कर

ऑस्कर 2023 मध्ये भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाने बाजी मारली आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डाॅक्युमेंट्री शाॅर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.