घाडीगावकर समाजाचा १७ मार्च रोजी मोफत वधू वर मेळावा

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :क्ष. मराठा घाडीगावकर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या “मध्य मुंबई विभागा” तर्फे घाडीगावकर समाजातील ” वधू आणि वर, तसेच पालक यांचा परिचय मेळावा ” १७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा समाजातील बांधवांसाठी उपयुक्त असून हा मेळावा राज्यस्तरीय पातळीवर आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समाजातील विवाह इच्छुक वधू-वरांनी सदर मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या योग्य वधू-वरची निवड करावयाची आहे. सदर मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग, पुणे व नाशिक जिल्ह्यातूनही काही वधुवर उपस्थितीत राहणार आहेत. याबाबत सविस्तर माहितीसाठी संस्थेचे मध्यवर्ती समितीचे कार्यकारणी सदस्य श्री रघुवीर वायंगणकर यांना (८८३०६६६५७९) या नंबर वर संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.