राजापूर Breaking: जमिनीची मोजणी करून हवीय मग माझं केबिन रंगवून दे 

 

 

राजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाचीअजब मागणी 

लचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला ताब्यात घेऊन केली कारवाई

लाच घेण्याचे नवनविन प्रकार समोर येत असून वडिलोपर्जित जमीनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतः च्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करुन घेणाऱ्या राजापूर येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक सुशिल रामदास पवार याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी मुसक्या आवळल्या.

 

याबाबत ४३ वर्षीय तक्रारदाराने अँटी करप्शन खात्याकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी लोकसेवक सुशिल रामदास पवार, उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय राजापूर. ता. राजापूर जि. रत्नागिरी याने तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी स्वतः च्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करून देण्याची दिनांक ०१/०३/२०२४ व ०६/०३/२०२४ रोजी मागणी केली होती. त्यानुसार लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडून दिनांक ०८/०३/२०२४ व १०/०३/२०२४ या कालावधीत त्यांच्या केबिनचे रंगकाम विना मोबदला करून घेतले .

 

या अजब मागणीची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत खात्याकडे केल्यानंतर आज मंगळवारी आरोपी लोकसेवक यांना पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 

 

या कारवाई मधे

पोलीस निरीक्षक, अनंत कांबळे ,

पोहवा.विशाल नलावडे.

पोहवा. हुंबरे

पो. ना. दिपक आंबेकर

पो.कॉ. हेमंत पवार यांचा पथकात सहभाग होता टीआर यासाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी म्हणून श्री सुशांत चव्हाण

पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी यांनी काम पाहिले

 

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*

*मा.श्री. सुनिल लोखंडे सो,

पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*

*मा.श्री. महेश तरडे सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

*मा.श्री.सुधाकर सुराडकर सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

▶️ तपासी अधिकारी

अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी

▶️आरोपी लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी

मा. जमाबंदी आयुक्त, पुणे

*रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.*

संपर्क :-

१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893

२) श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.नं.9823233044

३) श्री शहानवाज मुल्ला, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो. नं. 7774097874

4) श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.न. 7507417072

३) *टोल फ्री:- १०६४*

चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू(सदरचा मेसेज आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये प्रसारित करावा ही विनंती)