पोईप येथील विकास कामांचे भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील पोईप वेताळ मंदिर येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप नेते डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी पोईप वेताळ मंदिर ते खालची पालववाडी (पाच लाख रुपये), सोनारतिठा ते खालची पालववाडी (दहा लाख), करमळी वाडी (पाच लाख), दत्तमंदिर ते खालची माधववाडी (पाच लाख) अशी पाच रस्त्यांची कामे मंजूर केल्या बद्दल पोईप ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक, ग्रा. सदस्य विष्णू पालव, सहदेव वेंगुर्लेकर, मनाली नाईक, संपदा सांवत, दिपाली जाधव, संच्छि़दा पालव, भाजप पोईप अध्यक्ष बाळा पालव, शिवसेना पोईप शाखा प्रमुख नारायण राणे, उप शाखा प्रमुख श्रीधर पालव, महेश पालव, महेंद्र पालव, अमेय नाईक, मंगेश नाईक, बाबाजी नाईक, सत्यवान नाईक, सुरेश नाईक, राजेंद्र सावंत, सुर्यकांत परब, अनिकेत सावंत, अजय जाधव, सोमा जाधव, लक्ष्मण जाधव, शांतीदास भाट, विलास माधव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.