आय एन सी सी मानव अधिकार, संपादक, सिने कलाकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी विक्रांत गांधी

 

 

खेड(प्रतिनिधी)आय एन सी सी मानव अधिकार, संपादक , सिने कलाकार संघटने च्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते तसेच उद्योजक विक्रांत परशुराम गांधी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले आहे

 

श्री विक्रांत उर्फ नाना गांधी हे खेड शहर मधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत त्या मुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना रत्नागिरी जिल्हा या कार्य क्षेत्राची धुरा सोपवण्यात आली आहे या निवडी च्या माध्यमातून मानव अधिकार कार्य क्षेत्रात येणाऱ्या सर्व बाबींना न्याय देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे श्री गांधी यांनी सांगितले त्यांच्या या निवडी बद्दल खेड शहरातून अभिनंदन केले जात आहे