विविध भागातील रस्त्यांच्या कामांची भूमिपूजने
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान

राजापूर (प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शिफारशीने व पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या राजापूर तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांच्या कामांची भूमिपूजने सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू यांच्या उपस्थितीत पार पडली. सातत्याने राजापूर तालुक्यातील हे रस्ते मार्गी लागावे यासाठी ग्रामस्थांकडून मागणी होत होती. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत: लक्ष घालून या रस्त्यांसाठी शासनाकडे शिफारस केली होती. याबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शिफारशीने व पालकमंत्री ना.सामंत यांच्या निधीतून हातिवले विखारे गोठणे पुंभारवाडी, बौध्दवाडी, डोंगर मुसलमानवाडी रस्ता दर्जोन्नत करणे, महाळुंगे डोंगर रस्ता दर्जोन्नत करणे, पालकमंत्री ना.सामंत यांच्या शिफारशीने मंजूर झालेला तळगाव टाकेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, आजिवली हातदे नेर्ले मुख्य रस्ता दर्जोन्नत करणे, कळसवली चुनाकोळवण निवखोलवाडी रस्ता दर्जोन्नत करणे, खरवते कोदवली हर्डी रस्ता दर्जोन्नत करणे व गोठणे मराठवाडी राववाडी, मठवाडी, तिसेवाडी रस्ता दर्जोन्नत करणे या कामांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शिफारशीने व पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या कामांना निधी मंजूर झाला असून याकरीता सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी प्रयत्न केले आहेत.
या कामांची भूमिपूजने शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गुरव, भाजता तालुकाध्यक्ष भास्कर सुतार यांच्यासह दीपक बेंद्रे, भरत लाड, तालुका युवक अध्यक्ष अरविंद लांजेकर, माजी जि.प.सदस्य अजित नारकर, माजी उपसभापती भाग्यश्री लाड, भाजपा अनु. जाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारूती कांबळे, भाजपाचे मोहन घुमे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्रभावती कानडे, नाना कोरगांवकर, आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक दीपक शेलार, मंगेश पावसकर, प्रशांत मोंडकर, विलास हर्याण, तळगाव सरपंच रमेश सुद, विखारे गोठणे सरपंच अमोल जोगले, बाळा चव्हाण, आप्पा साळवी यांच्यासह शिवसेना, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षे रखडलेली रस्त्यांची मागणी पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.










