सरगवे श्री खंडोबा मंदिर २१वा वर्धापदिन १६ रोजी

 

 

दोडामार्ग l प्रतिनीधी :      सरगवे पुनर्वसन येथील श्री खंडोबा, सातेरी, केळबाई, शंभू महादेव, म्हारिंगण पंचायतन देवस्थानचा २१ वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि. १६ मार्च रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ९ वा. सर्व देवतांचा महाअभिषेक, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थ प्रसाद, दुपारी १:३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सुश्राव्य भजन व रात्रौ १० वा. आजगावकर दशावतार नाट्य मंडळ आजगाव यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी व नाट्य रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.