लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील गवाणे गवळीवाडी राधाकृष्ण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन राजापूर विधानसभा निवडणुक प्रमुख उल्का विश्वासराव यांच्या हस्ते आज शुक्रवारी सकाळी झाले.
या रस्त्यासाठी राजापूर विधानसभा निवडणुक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी तांडावस्ती योजनेअंतर्गत १० लाख रूपये इतका निधी मंजूर करून आणला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन आज
सौ.उल्का विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते संपन्न झाले. त्यांनी नारळ वाढवून कामाचा शुभारंभ केला.
यावेळी भाजपा लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर टोले, तालुका सरचिटणीस विराज हरमले, शैलेश खामकर, गवाणे गावातील भाजपा पदाधिकारी यांसहित शेकडो ग्रामस्थ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, वाॅरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
गवाणे येथील ग्रामस्थांकडून सौ. उल्का विश्वासराव यांना गावाच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे काम मंजूर करुन आणल्याबद्दल आभार मानले आणि “अबकी बार ४०० पार” चा नारा देत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा खासदार विजयी करून देण्यासाठी आम्ही कायम आपल्या सोबत असू असे आश्वासन दिले .
.












