खडपडे कुंभवडे रस्त्यावर चक्क पट्टेरी वाघाचे दर्शन!!!

दोडामार्ग l सुहास देसाई :तालुक्यातील तळकट खडपडे कुभंवडे रस्त्यावर खडपडे येथे आज सकाळीच 11:30 वाजता पटेरी वाघाचे दर्शन झाले त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणारे ग्रामस्थ व अन्य दुचाकी व वाहन यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या मार्गावर कायम जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो याकडे लक्ष देउन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे

आज सकाळीं तळकट खडपडे कुभंवडे रस्त्यावर खडपडे येथे सकाळीच 11:30 वाजता पटेरी वाघाचे दर्शन झालेअसल्याने दररोज येजा करणारे ग्रामस्थ यांच्यात भीतीचे सावट निर्माण झाले आहे यापूर्वी वारंवार मागणी करूनही वन विभागाला जाग येत नाही काही दिवसापूर्वी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक जनावरे जखमी झाली होती त्याप्रमाणे वस्तीकडे फिरन्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वन विभाग यांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे