जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची यशस्वी शिष्टाई
पालकमंत्री यांचे मानले ग्रामस्थांनी आभार!!
अखेर त्या पत्राला स्थगिती!
दोडामार्ग प्रतिनिधी
साटेली-भेडशी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेला ठरावावरून सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. ग्रामपंचायतने घेतलेला ठराव जिल्हा परिषदेने घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याच्या सूचना दिल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहे त्यामुळे त्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच ठेवले होते अखेर तिसऱ्या दिवशी सायंकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचेशी पाठपुरावा करून मुख्ख कार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या स्थगिती पत्राने मागे घेण्यात आले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक गवस, कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, संजय साताडेकर आंनद तळणकर भैया पागम उपसरपंच सौ डिंगणेकर आदी उपस्थित होते
तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी साटेली भेडशी ग्रामपंचायतिने तीन महिन्यांपूर्वी साटेली-भेडशी येथील एका बेकायदा इमारतीत दोन तलवारी सापडल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संबंधित इमारत जमीनदोस्त करण्यात आली. याप्रकरणी दोषींवर कारवाई होऊन त्यांचे गावातील व्यवसाय आणि उद्योग बंद करण्यात यावेत, असा ठराव ग्रामसभेत एकमताने पारित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही संबंधित व्यक्तींचे व्यवसाय सुरूच राहिल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.त्यापासून वाद सुरु आहे
त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा ग्रामसभा बोलावून सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी आठ तास चाललेल्या या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत, संबंधित व्यावसायिकांना लेखी नोटीस देऊन त्यांचे व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार नोटीस देण्यात आल्यावर ग्रामस्थांनी काहीसा दिलासा व्यक्त केला होता
या दुसऱ्या ठरावाची प्रत गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) यांच्याकडे सुपूर्त केले. संबंधित व्यावसायिकांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार, साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या ठरावांद्वारे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१) (जी) म्हणजेच, कोणत्याही व्यक्तीस व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग करण्याचा मूलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार यांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणत्याही व्यक्तीचा व्यवसाय बंद करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत, ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १५२ अन्वये या ठरावांची अंमलबजावणी तात्काळ स्थगित करण्याच्या सूचना दिल्या.
ही माहिती ग्रामस्थांना, समजली व संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा एकदा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत आंदोलन तीव्र केले. ग्रामसभेने घेतलेला ठराव कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये आणि संबंधितांचे व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त करत, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वत: साटेली-भेडशी ग्रामपंचायतीत येऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधावा व निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी असा इशाराही दिला की, जोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः ग्रामपंचायतीत येऊन ठराव रद्द करीत नाहीत, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहील.अशा प्रकारे आक्रमक पवित्रा घेतला
प्रशासनाच्या मध्यस्थीचे प्रयत्न अपुरे!”
गेल्या दोन दिवसांपासून गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामस्थांशी सातत्याने चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या चर्चांचा कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशी सायंकाळी पर्यत सुरूच होते.अखेर पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कडे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लेखी पत्र प्रशासनाकडून सदर आदेश स्थगित करण्यात येत असल्याचे दिल्याने मागे घेण्यात आले यावेळी साटेली ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. नितेश राणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा अध्यक्ष दिपक गवस यांचे आभार मानले यावेळी चेतन चव्हाण, मनीष दळवी यांनी मागदर्शन केले
यावेळी बोलताना मनीष दळवी यांनी सांगितले की, साठेली भेडशी वासियांचा पाठीशी आपण कायम असून भविष्यात ग्रामपंचायतीला लागणारे सर्व सहकार्य करण्यात येणार आहे यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे साहेबाच्या माध्यमातून विकास कामासाठी लवकरच बैठक घेतली जाईल व आपणास योग्य तों न्याय दिला जाईल आजचे ठिय्या आंदोलन लेखी पत्र दिल्यावर मागे घेतले त्या बद्दल ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते अखेर न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली जात होती लेखी पत्रात गटविकास अधिकारी पंचायत समिती दोडामार्ग यांच्या प्राप्त अहवालानुसार ग्रामंपचायतीची मासीक सभा किंवा ग्रामसभा मधील अंमलबजावणी तात्काळ लक्षवेधी प्रभावाने स्थगित करावी व या पुढे संविधानिक मासिक सभा किंवा ग्रामसभा ठरावाने भारतीय संविधानाच्या अधिकारास बाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे कळविण्यात आलेले होते त्या अनुषंगाने प्राप्त अहवालाचे अवलोकन करता, तसेच सदर प्रकरणी सद्यस्थितीची माहिती व मात्तीक सभा दिनांक २३/०६/२०२५ ठराव क्र.१२(२) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ८(२) अन्वये ग्रामसभेत दिलेल्या सुचना ग्रामपंचायतीने (मासीक सभेने) स्विकारल्याच पाहिजेत असे पंचायतीवर बंधन घालण्यात आलेले नाही, अशी तरतुद असल्याने या कार्यालयाकडील संदर्भ क्र.०२ अन्वये दिलेले पत्र रद्द समजण्यात यावे च आपण यापुढे महाराष्ट्र ग्रामंपचायत अधिनियमातील तरतुदी व शासनाकडुन वेळोवेळी दिलेले निर्देश यांचे पालन करुन ग्रामपंचायतीचा कारभार करावा.
असे निर्देश रविंद्र खेबुडकर(भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिले आहे त्यामुळे साटेली भेडशी ग्रामस्थाचे ठिय्या आंदोलन लेखी पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,यांनी उपसरपंच ग्रा. प सदस्य यांना दिले यावेळी ग्रामविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक खोपडे आदी उपस्थित होते











