खेड मध्ये विकास कामांचे भूमी पूजन

 

खेड(प्रतिनिधी) दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.योगेश कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या खेड नगर परिषद हद्दीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.शशिकांतजी चव्हाण, श्री.चंद्रकांत (अण्णा) कदम, व शिवसेना खेड तालुकाप्रमुख श्री. सचिनजी धाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

भूमिपूजन झालेल्या कामामध्ये न.प.हद्दीतील गुजर आळी येथील आयलँड बांधकाम करणे.
न.प.हद्दीतील बाजारपेठ येथे अयलँड बांधकाम करणे.
न.प.हद्दीतील वाणीपेठ येथे आयलँड बांधकाम करणे. न.प.हद्दीतील कोष्टी आळी येथे आयलँड बांधकाम करणे. न.प.हद्दीतील हनुमान पेठ येथे आयलँड बांधकाम करणे न.प.हद्दीतील वैश्य हनुमान मंदिर शेजारी असलेल्या आर.सी.सी नाल्यावर स्लॅप टाकणे., न.प.हद्दीतील पाठरजाई मंदीर ते गांधी चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.आदी कामांचा समावेश आहे

या वेळी शहरप्रमुख श्री.कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख श्री.प्रेमल चिखले, श्री.स्वप्नील सैतवडेकर,माजी नगरसेवक श्री.मिनार चिखले, श्री.राजेश बुटाला,श्री.पप्पू चिकणे,विभागप्रमुख श्री.अभीजित चिखले,युवासेना शहरप्रमुख श्री.सिद्धेश खेडेकर,शहर सचिव श्री.शुकलेंद्र काते,श्री.कुंतल चिखले,श्री.कौशल जाडकर,श्री.प्रणव शिरगावकर,श्री.ओंकार तोडकरी,श्री.रोहित यादव तसेच शिवसेना-युवासेना, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच युवतीसेना ,महिला आघाडी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.