सराईत गुन्हेगार बॉक्सर शहा तडीपार

रत्नागिरी | प्रतिनिधी : अवैध व्यवसायातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सराईत गुन्हेगार सर्फराज उर्फ बॉक्सर अहमद शहा (35,रा.गवळीवाडा,रत्नागिरी) याला उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.

सर्फराज शहावर अंमली पदार्थांसह मटका, जुगाराचे सुमारे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तिन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभेची आचारसंहिता शनिवारी जाहिर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अवैध व्यवसायातून कायदा व सुव्यवस्था बिघडून नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. यातीलच शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सर्फराज शहाविरोधात पाच गंभिर गुन्हे दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे पाठवला होता. त्यावर सुनावणी घेउन उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी शनिवारी सायंकाळी अंतिम आदेश करताना तिन जिल्ह्यांमध्यून हद्दपार केले.