प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाचा विद्यार्थी गुणगौरव व तालुका त्रैवार्षिक अधिवेशन कार्यक्रम संपन्न

जिल्हा परिषद शाळा लांजा ५ च्या सभागृहात पार पडला कार्यक्रम

लांजा( प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि शाळा तसेच शिक्षक वर्ग यांचा सत्कार सोहळा आणि तालुका त्रैवार्षिक अधिवेशन आज रविवारी १७ मार्च रोजी लांजा शाळा क्र. ५ च्या सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे हे होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर लांजा गटशिक्षणाधिकारी विजयकुमार बंडगर, शिक्षक समितीचे कोकण विभागाचे अध्यक्ष बळीराम मोरे , विस्तार अधिकारी भांबेड शंकर रणदिवे, जिल्हा प्रतिनिधी परशुराम मासये, त्याचप्रमाणे राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, जिल्हा सरचिटणीस सुनील दळवी, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पावणे, दिलीप महाडिक, पतपेढी संचालक अमोल बोबस्कर, अरविंद जाधव, विस्तार अधिकारी विनोद सावंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यात दहावी, बारावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी चे आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ,नवोदय विद्यालय विद्यार्थी, आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक, आदर्श शाळा आणि समितीचे सेवानिवृत्त सभासद या सर्वांचा गौरव आणि सत्कार या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सलग २७ व्या वर्षी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांच्या त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी कौतुक केले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप दिवाळे, कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, दिनेश झोरे ,अरविंद जाधव ,काशिनाथ आंबे ,सुदेश आयरे ,मधुकर चौगुले, संतोष वारंग, संतोष पालकर ,तुकाराम कोलापटे यांच्यासह सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकारी सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.