स्वप्निल महाडिकने अर्थाजनाचा शोधला नवा मार्ग
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील पुरे खुर्द येथील स्वप्निल महाडिक याने शालेय शिक्षणानंतर नोकरीसाठी मुंबईची वाट न धरता गावातीलच शेतजमिनीत कलिंगडाची लागवड ऊरून अर्थाजनाचा नवा मार्ग चोखाळला आहे. कलिंगडाच्या लागवडीद्वारे विक्रमी पिक उत तरूणांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.

तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सल कंपनीचे सामाजिक दायित्व राबवणाऱ्या स्वामी विवेकानंद रिसर्च सेंटर येथे नोकरी करत स्वप्निल महाडिक याने शेतीचीही आवड जोपासली आहे. पुरे खुर्द येथील तरूणांना प्रेरणा मिळेल, असं शेतात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्याने अनेक प्रयोग केले आहेत. यावर्षी अडीच एकर जागेत कमी पाणी लागणाऱ्या कलिंगडची लागवड केली आहे. यासाठी।मेहनत व पिकांची देखभाल करत विक्रमी
पीक देखील घेतले आहे.
पहिल्या टप्प्यात १० टन कलिंगड काढून बाजारपेठेत विकण्यासाठी पाठवण्यात यश आले आहे. येत्या काळात अजून २० टन कलिंगडाची नक्कीच लागवड करण्यात यश येईल, असा विश्वास त्याला आहे. १० ते १२ तास मुंबईत राहून नोकरीपेक्षा ४ तास स्वतःच्या शेतात राबलो तर नक्कीच चांगले उत्पन्न प्राप्त होते, अशी त्याची
धारणा आहे. यामुळे तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या जमिनीत लागवड करून आर्थिक उत्कर्ष साधण्याचे आवाहनही स्वप्निल महाडिक याने केले आहे.










