फिनोलेक्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या टीम मॅटाडोअर्सचे “ई-बाजा २०२४” या चॅम्पियनशीप स्पर्धेत कौतुक

 

रत्नागिरी : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एस ए ई) इंडियाने राष्ट्रीयस्तरावरील ‘ई-बाजा २०२४’ ही स्पर्धा दिनांक ६ मार्च २०२४ ते ११ मार्च २०२४ या कालावधीत बी व्ही राजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नरसापूर, तेलंगणा येथे आयोजित केले होती. देशभरातील विविध संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन इलेक्ट्रिक ऑल-टेरेन व्हेइकल्स ( एटीव्ही ) प्रदर्शित केले होते. फिनोलेक्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः इलेक्ट्रिक ऑल-टेरेन व्हेइकल्स ( एटीव्ही ) बनवून “ई-बाजा २०२४” या चॅम्पियनशीप स्पर्धेत आपला सहभाग

नोंदवला होता.

श्री बी.एस. रमेश ( हेड ऑफ ॲकॅडेमिक इनीशीएटिव्ह, एएलटीएआयआर ) यांनी फिनोलेक्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक एटीव्ही व्हेहिकलच्या डिझाइनमधील नावीन्यपूर्णतेचे व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच त्यांनी

व्हेहिकलच्या निर्मितीची अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि अग्रेषित-विचार करण्याच्या दृष्टीकोनासाठी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

कु. झीशान वाडकर यांने या क्षेत्रातील त्यांचे कौशल्य आणि ज्ञान प्रदर्शित करून बाजा ॲप्टिट्यूड टेस्ट उत्तीर्ण केली, त्यानंतर कु. झीशान वाडकर यांची डीईपी मेशवर्क कंपनीने पुढील फेरीसाठी निवड केली आहे.

फिनोलेक्स ॲकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांच्या टीमने या स्पर्धेत सहभाग घेतला होता तसेच प्रा. प्रसाद जे. कदम यांचा सल्लागार प्राध्यापक म्हणून समावेश होता. टीम मॅटाडॉर्सने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक एटीव्ही संघाच्या कामगिरीवर तेलंगणातील सात वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी प्रकाश टाकला. या विस्तृत मीडिया कव्हरेजमुळे विद्यार्थ्यांचा प्रकल्प अधिक व्यापक प्रेक्षकांसमोर दाखवला गेला व या इलेक्ट्रिक एटीव्हीची प्रतिष्ठा आणखीनच वाढली आहे.

या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण टिमचे अभिनंदन केले आहे.