राज्य स्तरीय रंगोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा वनगुळे नंं. १ राज्यात बेस्ट परफॉर्मन्स पुरस्काराने सन्मानित

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे पार पडला कार्यक्रम 

 संतोष कोत्रे l      लांजा -: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आज मंगळवारी १९ मार्च रोजी सायंकाळी ३ घ्या सुमारास पार पडलेल्या राज्य स्तरीय रंगोत्सव कार्यक्रमात लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वनगुळे नंं. १ ला संपूर्ण महाराष्ट् राज्यातून बेस्ट परफॉर्मन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाच्या राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रमासाठी लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ ची निवड झाली होती . आज मंगळवारी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करताना जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वनगुळे नंबर १ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त शाळा हे नाट्य सादर केले. या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी मनस्वी गुरव, रिया गुरव ,तनुष्का गुरव, सूचित तावडे ,शैलेश गुरव ,गौरव घाडी ,श्लोक गुरव आणि समर्थ गुरव या विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे नाट्य बनवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र निवळे, शिक्षक विलास गोरे, बाळू नागरगोजे, श्रुती शुभ्रा ठाकूर देसाई तसेच सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले होते.

हा रंगोत्सव कार्यक्रमात बेस्ट परफॉर्मन्स पुरस्काराने वनगुळे शाळा नंबर एकला सन्मानित करण्यात आले.याबाबत शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.