सहवेदना : बाबाजी खांबे यांचे निधन

माखजन |वार्ताहर :

चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र,न्यायासाठी झगडणारा, स्वाभिमानी व सच्चा कुणबी बहुजनांचा नेता, शेतकऱ्यांचा आधारवड कै.बाबाजी खांबे यांचे निधन.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उपाध्यक्ष व आदर्श शेतकरी कै. बाबाजी खांबे यांचे आज दुःखद निधन झालं त्यांचा आज दुपारी एक वाजता अंत्यविधी झाला.

कृषी विभागाच्या जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांनी भातशेती व्यवसायाबरोबरच कलिंगड, भाजीपाला लागवड हा व्यापारी तत्त्वावर लागवड सुरू केली. ग्रीन हाऊस मधील जरबेरीयाची फुल शेती देखील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केली होती. गोड्या पाण्यातील मत्स्य शेती छोटे-मोठे तलाव बांधून त्यात मासे व कोळंबीचे संवर्धन केले होते त्यातही ते यशस्वी झाले होते. त्यांचा आदर्श घेत मांडकी परिसरात आजही अनेक शेतकरी कलिंगड भाजीपाला ,गोड्या पाण्यातील मत्स्य शेती आदी व्यवसाय करत आहेत. “आधी केले मग सांगितले” अशा प्रमाणे त्यांनी शेतीमध्ये स्वतः लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळाल्यानंतर ते शेतकऱ्यांना चांगलं प्रकारे उत्पन्न कशाप्रकारे घेता येते हे दाखवून देत आणि त्यामुळेच अन्य शेतकरी त्यांचा अनुकरण करत असत.

त्यांच्या अंत्यविधीसाठी आमदार शेखर निकम,उद्योजक् नाना निकम,युगंधरा राजेशिर्के बाळशेट जाधव,तानाजी चोरगे, सुरेशजी भायजे, सुरेश खापले, निखिल चोरगे,प्रशांत यादव मा. मनोहर महाडिक,निरंजन नलावडे , रावसाहेब सुर्वे, मानसिंग महाडिक, चंद्रकांत सुर्वे आणि पंचक्रोशीतील सर्व पक्षीय सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरीक उपस्थित होते.