वरुण लिमये यांची भाजपा पुणे शहर युवा मोर्चा कार्यकारिणी मध्ये नियुक्ती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या पुण्याच्या शहर भाजप युवा मोर्चा टीम मध्ये रत्नागिरीचा सुपुत्र वरुण लिमये याची ‘कार्यकारिणी सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि युवा अध्यक्ष करण मिसाळ यांच्या हस्ते वरुण लिमये यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाविद्यालयीन काळापासून विद्यार्थी चळवळीत केलेलं काम तसेच रत्नागिरी भाजपा युवा टीम मध्ये काम करण्याचा अनुभव यामुळे वरुण लिमये यांचा पुण्याच्या कार्यकारिणी मध्ये समावेश केल्याचे भाजपा युवा सरचिटणीस दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

मूळचे रत्नागिरीचे वरुण लिमये सध्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत.

शैक्षणिक आणि सामाजिक कामाची आवड असल्यामुळे राजकीय क्षेत्रात काम करताना ते आणखी प्रभावीपणे काम करता येईल, असे यावेळी वरुण यांनी बोलताना सांगितले. पुणे आणि रत्नागिरी ही दोन्ही सांस्कृतिक शहरे असून दोन्ही शहरातील समन्वयाने पर्यटन, खाद्यसंस्कृती तसेच इतर व्यवसायात देवाणघेवाण होऊ शकते असेही वरुण याने यावेळी नमूद केले.

भाजपा पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी भक्कम योगदान देण्याचा निश्चय यावेळी युवा कार्यकारिणीने केला.

या नियुक्तीबद्दल वरुण लिमये याने मार्गदर्शक म्हणून भाजपा पुणे लोकसभा उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे,महाराष्ट्र युवा सरचिटणीस सुशील मेंगडे,अभिजित राऊत, दुष्यंत मोहोळ आणि संपूर्ण भाजपा टीमचे तसेच रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांचे खास आभार मानले.