राजीवडा येथील बोटीवरुन अज्ञाताने तब्बल 54 हजार रुपयांचा 60 पितळी रिंगा लांबवल्या

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील राजीवडा येथील बोटीवरुन अज्ञाताने तब्बल 54 हजार रुपयांचा 60 पितळी रिंगा लांबवल्या. ही घटना शुक्रवार 22 मार्च रोजी मध्यरात्री 1.15 ते शनिवार 23 मार्च रोजी सकाळी 7 वा.कालावधीत घडली आहे.

याबाबत बोट मालक सोहेब अब्दुल रहिमान मस्कर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी त्यांनी आपली बोट राजीवडा जेटी येथे लावली होती. त्या बोटीवरील 60 पितळ धातुच्या 54 हजारांच्या रिंगा अज्ञाताने चोरुन नेल्या. ही बाब शनिवारी सकाळी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.