होप फाऊंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा एम कटारा “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल होप फाऊंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा एम कटारा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होप फाऊंडेशन हे फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या दोन शैक्षणिक संस्था आणि प्रल्हाद पी छाब्रिया रिसर्च सेंटर या संशोधन क्षेत्रातील संस्थाच्या माध्यमातून भारतातील शेकडो विद्यार्थ्यांना कौशल्य आणि ज्ञानाने सुसज्ज करण्याबरोबरच उद्योग संधी उपलब्ध करून देते. त्यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हे त्यांच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोच पावतीच आहे.

समाजाभिमुख कार्य करण्याचा हा वारसा त्यांना त्यांचे वडील कै. प्रल्हाद पी छाब्रिया (फाऊंडर चेअरमन – फिनोलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि फाऊंडर प्रेसिडेंट – होप फाऊंडेशन) यांचेकडून मिळाला आहे.

हा जीवनगौरव पुरस्कार श्रीमती अरुणा कटारा ( अध्यक्षा, होप फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर पुणे) यांना डॉ संदीप पाचपांडे ( अध्यक्ष, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे) यांच्या हस्ते दि १४ मार्च २०२३ रोजी शेरेटन ग्रँड हॉटेल, बंड गार्डन रोड, पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. रामचंद्रन गोपालकृष्णन ( अध्यक्ष, इनोसर्व ग्रुप ) हे उपस्थित होते.

एसएमएक्स नेटवर्कने महिला उद्योजकता आणि इनोव्हेशन कॉनक्लेव्ह २०२३ ची घोषणा केली. समतोल राष्ट्रीय विकासासाठी महिला उद्योजकांचा शाश्वत विकास घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक मंच प्रदान करणे व भारताला विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्व आघाड्यांवर स्पर्धा करत अग्रेसर बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी देशात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे अशा उद्योजक आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम प्लेयर्सच्या कामगिरीची ओळख आणि सन्मान या कार्यक्रमात केला गेला.

महिला उद्योजकता आणि इनोव्हेशन कॉनक्लेव्ह २०२३ हा कार्यक्रम २० पेक्षा जास्त नामांकित नेते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सरकारी उपक्रम आणि थिंक टँक यांना एकाच छताखाली आणेल आणि सतत बदलणारे आणि विकसित होणारे दृष्टिकोन आणि वाढीच्या संधींवर या कार्यक्रमात चर्चा झाली तसेच १०० हुन अधिक प्रमुख उद्योग भागधारकांसह नेटवर्किंगच्या संधी देखील प्रदान केल्या गेल्या.