उन्हामुळे वाहन तपासणीच्या वेळेत बदल

 

रत्नागिरी : माहे मार्च, एप्रिल व मे या महिन्यात वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणी ही ब्रेक टेस्ट ट्रॅकवर तसेच कार्यालयीन तसेच शिबीर कार्यालय ठिकाणी होत असल्याने त्या कामकाजानिमित्त वाहनधारक वाहनचालकास उन्हाचा त्रास टाळण्याकरिता सदर कामकाजाच्या माहे मार्च, एप्रिल व मे या महिन्यांसाठी वेळेत बदल करण्यात येत आहे.
परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी-कार्यालयीन वेळेच्या एक तास आधी सकाळी ०८.४५ पासून, पक्की अनुज्ञप्ती चाचणी कार्यालयीन वेळेच्या एक तास आधी सकाळी ०८.४५ पासून, शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी कार्यालयीन वेळेच्या एक तास आधी सकाळी ०८.४५ पासून होईल. तरी कामकाजाच्या बदललेल्या वेळेबाबतची सर्व वाहन धारकांची याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.