राजन आंगणे मित्र परिवारातर्फे उद्या सावंतवाडीत शोकसभा

सावंतवाडी : सावंतवाडीतील प्रतिथयश उद्योजक राजन आंगणे यांचे १८ मार्च रोजी आकस्मिक निधन झाले. सावंतवाडीतील हेल्पलाइन ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात सुरू होते.

उद्योग व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या दिलदार व्यक्तिमत्वामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. त्यांच्या याच मित्र परिवारातर्फे बुधवार २७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी राजन आंगणे प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्व. राजन भाई आंगणे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.