
दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकणातील रहिवासी शहराकडे नोकरी व्यवसायास जरी स्थलांतरित झाले असले तरी ते आपल्या मायभूमीतील परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न शहराकडे देखील करत आहेत.
कोकणात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव सुरू आहे. हाच शिमगोत्सव सोमवार दि.25/3/2024 रोजी विरार पूर्व, कारगिल नगर इथे गुहागर मधील विसापूर, पेवे पालकोट, पाटपन्हाळे, वरवेली, पांगारी आदी इत्यादी ग्रामस्थ साजरा करताना पाहायला मिळाले. हे ग्रामस्थ विरार मध्ये विविध भागात राहत असून होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येऊन कोकणचे खेळे हे सज चढवून साजरा करतात. यामध्ये गोमू आणि संकासुर हे खासआकर्षण असते. परंतु कोकणात यांना देवाचे स्थान दिले जाते, त्यामुळे ते एक देवाचे रूपच जणू. ढोलकीच्या तालावर गाण्याच्या सुरांनी बेधुंद होऊन गोमू आणि संकासुर नाचतात, देवाला गाऱ्हाणे घालतात.
पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतुने कोकणचे खेळे हा जग प्रसिध्द असलेला खेळ आता कोकणातच नाही तर गेली ५-६ वर्षापासून विरारमध्ये कोकणची लोककला जपत आहेत.











