चार जण जखमी; 25 फूट दरीत कठडा तोडून गाडी खाली कोसळली
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ब्रिटिशकालीन सोनवी पुलावरून ईरटीगा गाडी नदीत जावून कोसळली. सदरच्या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात सोमवारी संध्याकाळी ४.४५ वाजण्याच्या दरम्यान घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र वासुदेव अपराज, नालासोपारा, महेश शांताराम अपराज, नंदकुमार शांताराम टेमुलकर मालवण, दीपक विलास अपराज, सुहास एकनाथ अपराज हे या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळ जुना ब्रिटिश कालीन पूल आहे. सद्या ब्रिटिश पूल पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या गाड्यांसाठी सद्यस्थितीमध्ये ब्रिटिशकालीन सोनवी पुलावरून जावे लागते. होळीचा सण सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे आलेले आहेत. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे ईरटीगा गाडी सोनवी पुलावरून खाली कोसळली. 26 फूट दरीत गाडी कोसळल्यानंतर माबळे येथील ग्रामस्थांनी जखमेना वरती काढून रुग्णलयात हलविले.












