खोडेतील आगीतून घर बचावले

खेड (प्रतिनिधी) तालुक्यात वणव्यासह आगी लागण्याच्या दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी दुपारी २च्या सुमारास खोंडे शिवाईनगर येथे अचानक लागलेल्या वणव्याने नजीकच्या रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. वणव्याबाबत नगर केंद्रास परिषदेच्या अग्निशमन कळवल्यानंतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले कर्मचाऱ्यांच्या घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. उन्हामुळे वणवा आणखीनच भडकला. ग्रामस्थांनी वणवा आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन केंद्रातील फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहनचालक विद्याधन पवार यांनी. काही तासातच वणवा आटोक्यात आणला कर्मचार्यांना च्या  तत्परतेमुळे वणव्यातून घर सुखरूप  बचावले.