सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांचे प्रलंबीत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार : शिक्षणाधिकारी.

 

रत्नागिरी : दिनांक २७/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) म्हणुन नुतन पदभार स्वीकारल्याबद्ल कासार यांची संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पुढील विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सातवा वेतन तिसरा /चौथा व इतर उर्वरीत राहीलेले सर्व हप्ते शालार्थ प्रणाली मार्फत माहे १५ एप्रिल २०२४ पुर्वी सबंधीत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील.मात्र २०१६ पुर्वी सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत व त्यावेळी शालार्थ प्रणाली आयडी त्यांना नसल्यामुळे अशा शिक्षकांच्या रक्कम जमा करणे अडचणीचे असल्यामुळे व ऑफ लाईन रक्कम जमा करता येत नसल्यामुळे जि.प.ने शासनाकडे मार्गदर्शन मागिवले आहे त्यानुसार त्वरीत कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.

मेडिकल बिल,ज्यांचे ४% महागाई फरक देण्याचे राहीले आहेत त्याची पुर्तता करण्याचे प्रत्येक सर्व तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी याना दोन दिवसांपुर्वी सुचना देण्यात आली असल्याचे सांगितले.

३० जूनला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्या साठी ज्यांची सेवापुस्तके प्राप्त होत नाहीत (गहाळ झालेली आहेत) याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी महो.चर्चा करून निश्चित स्वरूपात मार्ग काढण्यात येईल.

शिक्षणविस्तार अधिकारी यांना पदोन्नती वेतन वाढ संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे त्याबाबत सकारात्मक माहिती मिळाली तर त्वरित सबंधीत प्रस्ताव मंजुर करून लाभ दिला जाईल.

महाराष्ट्र शासनाकडिल दि.२०/३/२०२४ पत्रान्वये मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख यांना पदोन्नती वेतनवाढ मंजूर करताना अंदाजे आर्थिक रक्कम जि.प. ला द्यावी लागेल याचा अंदाज पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे.

स्वर्गामी प्रवास भत्ता यासाठी आवश्यक रक्कम शासनाकडून प्राप्त होत नसल्यामुळे ही बिले प्रलंबित आहेत याबाबत ही सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

गटविमा प्राप्त होण्यास होत असलेल्या दिरंगाई बाबत मा.शिक्षणाधिकारी यांनी आढावा घेऊन त्वरीत पुर्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

या चर्चेत जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर खानविलकर , कार्याध्यक्ष श्री. यशवंत पाडावे,सचिव श्री.माणिक कांबळे, कोषाध्यक्ष श्री.विकास दळवी,सल्लागार श्री.चंद्रकांत वाडकर,श्री.उदयजी शिंदे,श्री.राजाराम सावंत यांनी उत्तम प्रकारे सहभाग घेऊन सर्व समावेशक सकारात्मक चर्चा घडवून आणली.यादरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमा मिळण्यासाठी जे वंचित राहातील त्यांची तालुका निहाय यादी तयार करून त्वरीत जिल्हा परिषदेला प्राप्त होण्यासाठी संघटनेने सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी मा.श्री. कासार साहेब यानी केले यासंदर्भात संघटना नक्कीच सहकार्य करेल असे जिल्हाध्यक्ष श्री.खानविलकर यांनी सांगितले. या सदिच्छा भेटीमध्ये सदस्य श्री.अशोक भाटकर, श्री.काझी सर सेवानिवृत्त शिक्षणवि.अधिकारी,श्री.इंद्रनिल नागवेकर व श्री.कदम सर उपस्थित होते.श्री.पाडावे यांनी शिक्षणाधिकारी व अधिक्षक /कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी नुतन पदभार वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.